Top News

गोंडपिपरी नगरपंचायतच्या अग्निशामक वाहन चालकाकडे परवानाच नाही #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी नगराध्यक्षावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप


गोंडपिपरी:- सविस्तर वृत्त असे की गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये गैरकारभार होत असल्याबाबतच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असताना सुरज ठाकरे यांनी माहिती अधिकाराद्वारे शंकेला पुरावा उपलब्ध करून देत थेट गोंडपिपरी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आमदारांवरच आरोप करत भ्रष्टाचार करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप लावला आहे.
🖼️

नगरपंचायत अंतर्गत अग्निशामक वाहन खरेदी करण्यात आले. अग्निशामक वाहन खरेदी केल्यानंतर अग्निशामक वाहनावर वाहन चालकाची पद नियुक्ती करताना नगराध्यक्ष यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वतःच्या नातेवाईक असणाऱ्या अमोल कुळमेथे यांची वाहन चालक म्हणून नियुक्ती करायला भाग पाडले.
🖼️

वास्तविकतेमध्ये माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्र व पुराव्यानुसार अमोल कुळमेथे यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवानाच नसल्याने अशा व्यक्तीला जाणून-बुजून स्वहितार्थ नगराध्यक्ष यांनी वाहन चालक पदावर ठेवले व आपल्या पदाचा गैरवापर केल्याने खरे पाहता परवाना नसलेल्या माणसाने वाहन चालवणे म्हणजे वाहन आणि सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचा जीव देखील नगराध्यक्ष यांनी जाणीवपूर्वक धोक्यात टाकल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला.
🖼️
नगराध्यक्ष यांचेवर कार्यवाही करून नगराध्यक्ष पद बरखास्तेची मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. नगरपंचायतवर यापूर्वी देखील राजकारण करत स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांना तब्बल सात महिने कामावर न घेतल्याचा आरोप लागलेला आहे. नगरपंचायत ही पूर्णतः नगरसेवक सुनील संकुलवार व नगराध्यक्ष कुळमेथे यांच्या दबावांमध्ये काम करत असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे. अशा बेजबाबदार नगराध्यक्ष व नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याकरिता सुरज ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने