पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक नवेगाव येथे तुरीची मढणी करीत असताना एका मजूराचा थ्रेशरमध्ये हात गेल्याने थेट मानेपर्यंत ओढला गेला व दुर्देवी घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला दुपारी दोन वाजता च्या सुमारास घडली. मृतकाचे नाव महेश अरुण लोहे वय २२ वर्षे असे असुन तो चेक नवेगाव येथील रहिवासी आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक नवेगाव येथील शांताराम कन्नाके यांच्या शेतामधील तुर काढण्यासाठी आष्टा येथील विजय बोढेकार यांच्या मालकीची थ्रेशर लावण्यात आली होती.चार मजूर कामावर होते. महेश तुरीची पेंडी टाकत असतांना उजवा हात मशीनमध्ये सापडल्याने तो ओढल्या गेला.व मानेपर्यंतचा भाग मशीनीत दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.