Top News

24 तासात चोरी व घरफोडीच्या अट्टल गुन्हेगारांना अटक #chandrapur #LCB #lcbchandrapur #arrested


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


चंद्रपूर:- जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरीच्या दोन अट्टल गुन्हेगारांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून 2 मोटारसायकल, मोबाईल, नगदी रक्कम असा एकूण 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ,Arrested criminals of theft and burglary in 24 hours

15 एप्रिल रोजी दुपारी फिर्यादी व त्याची पत्नी हे आपले मुलीला पेपर देण्याकरीता सेंटरला सोडुन मित्राकडे जाण्यास निघाले असता, शास्त्रीनगर एस.बि.आय. बँक मुल रोड चंद्रपुर समोरून एक अज्ञात इसम काळ्या रंगाच्या मोपेड ने पाठीमागुन येवुन तिच्या हातातील पर्स व त्यामध्ये एक वन प्लस कंपनीचा मोबाईल व नगदी 32,000/-रू असा एकुण 62,000/- रू ची जबरी चोरी झाल्याने पोस्टे रामनगर येथे अप. क. 396/23 कलम 392 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला.

👇
सदर गुन्हयाचा स्थागुशा चंद्रपुर हे समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोस्टे रामनगर रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार नामे आशिष उर्फ जल्लाद अकरम शेख वय 19 वर्षे रा. फुक्कट नगर, झोपडपट्टी श्यामनगर चंद्रपूर हा आनंद नगर महाकाली कॉलनी वार्ड चंद्रपूर येथे विना कागदपत्राचे मोबाईल विकण्यासाठी संशयास्पद स्थितीत फिरत आहे. अशा माहीती वरूण पोलीस स्टाफ चे मदतीने सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेवूण त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक आकाशी रंगाचा वन प्लस मोबाईल कि 30,000/- व लोअर च्या खिशात नगदी 8000/रू रूपये असा एकुण 38,000/- रू चा माल जप्त करण्यात आला.
➡️

आरोपीने एका दिवसा आधी दुपारी शास्त्रीनगर एस बि आय बँक चंद्रपूर जवळुन एका महीलेची हातातील पर्स हिसकावुन पळुन गेलो त्यामध्ये एक वन प्लस कपनीचा मोबाईल व नगदी 32,000/-रू होते ते पैसे काढुन पर्स कुठेतरी फेकुन दिला अशी माहिती दिली.
➡️

पोस्टे रामनगर अप.क्र. 396/23 कलम 392 भादवीचा गुन्हा नमुद आरोपीकडुन उघडकीस करण्यात आला. सदर आरोपीकडुन भिवापुर वार्ड हनुमान मंदिर जवळील चोरीस गेलेली एक काळया रंगाची होन्डा ॲक्टीवा MH 34 AG 8577 किंमत 50,000/- रू चा माल हस्तगत करून पो.स्टे. चंद्रपुर शहर अप क 252 / 23 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा उघडकीस करण्यात आला.
तसेच त्याच रात्रो एकुण तिन घरफोड्या करून सोन्याचांदीचे दागीने नागपुर येथे विकल्याचे सांगितले.

👇
तसेच एस.टि.बस स्टाफ चौक येथे एक ईसम हिरव्या रंगाचा फुल शर्ट व लोअर घातलेला असुन हा आपले जवळील बिना कागदपत्राची एक काळा व ऑरेज रंगाची फॅशन प्रो गाडी क्र MH 34 U 7031 हि क्रमाकाची गाडी विक्री करीता ग्राहक शोधत फिरत आहे. अशा माहितीवरून आरोपी नामे अमित हिरालाल निषाद वय 38 वर्ष रा. मौलाना झाकीर हुसैन वार्ड बल्लारपुर हल्ले मु. छोटु काबळे यांचे घरी. दत्त नगर चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन बल्लारशाहा सरकारी दवाखान्या समोरून चोरलेली हिरो पॅशन प्रो गाडी के MH34 U7031 कि 30,000/-रू हस्तगत करण्यात आली. पो.स्टे. बल्लारपुर अप क 916/22 कलम 379 भादवी. चा गुन्हा उघडकीस करण्यात आला.
👇

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि जितेंद्र बोबडे, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार व पो.अ. नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रमोद डंभारे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने