Fact Check: केंद्र सरकारची मोफत लॅपटॉप योजना, तुम्हालाही आला आहे का मेसेज? #Chandrapur #factcheck #PBI

Bhairav Diwase
0

PBI ने सांगितलं व्हायरल मेसेज मागील सत्य

Source:- Google 

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच लॅपटॉप बुक करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक तपशील विचारणारा एक लिंक असलेला मेसेज फिरत आहे.

source:- What'sup

विद्यार्थ्यांना केंद्र सरकार (Central Government) मोफत लॅपटॉप देणार असल्याचे मेसेज अनेक विद्यार्थ्यांना आले आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेबाबत तुम्हालाही मेसेज आला असेल तर सावधान, कारण हा मेसेज खरा नाही.

केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे मेसेज अनेकांना पाठवले जात आहेत. केंद्र सरकारकडून मोफत लॅपटॉप देण्यात येणार असून त्यासाठी प्रथम या मेसेजवरून नोदणी करण्यास सांगण्यात येत आहे. या मेसेजसोबत एका वेबसाईटची लिंक देखील देण्यात आली आहे. या लिंकमधील संपूर्ण माहिती भरण्यास सांगण्यात येत आहे. परंतु, या मेसेज मागील सत्यता पडताळण्यात आल्यानंतर हा मेसेज खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणाऱ्या या मेसेजमधून फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हालाही मोफत लॅपटॉप योजनेचा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.
दरम्यान, PIB ने यामागील सत्य सांगितलं आहे. सोशल मीडियावर प्रसारित केलेली लिंक आणि संदेश बनावट आहेत. पीआबीने वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)