पोंभुर्णा:- तालुक्यातील ५०% आदिवासी बहुल गावांना तात्काळ पेसा कायदा लागू करावा,वनजमिनी व महसूल जमिनी यावरील ५० वर्षापासून वहिवाट करीत असलेल्या बहुजनांना तात्काळ पट्टे देण्यात यावे, जिल्हातील निमशासकीय आदिवासी आश्रमशाळा यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्पा अंतर्गत सोय सुविधा दिसून येत नसल्याने त्या सर्व शाळाची चौकशी करून मान्यता रद्द करण्यात यावे, पोंभूर्णा, गोंडपिपरी, बल्लारशाह या क्षेत्रातील अभयारण्य व सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा,रामपूर दीक्षित,देवाडा खुर्द येथील बोगस पट्टे वरील अतिक्रमण उठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व सूरजागड लोह प्रकल्पातील अवजड वाहतूक तालुक्यातून होत असून लोह प्रकल्प व वाहातूक बंद करण्यात यावे आणि आदी मागण्यांसाठी पोंभूर्णा येथील बसस्थानक चौकात जन आक्रोश ,रस्ता रोको, ठिय्या आंदोलन मंगळवारी करण्यात येणार असून हा शहराचा मुख्य ठिकाण असून येते वर्दळ असतो,
मुख्य मार्ग असल्याने पोलिसांना धास्ती वाटू लागली आहे. ठिय्या आंदोलन हा सकाळी ८ वाजेपासून मागण्या मान्य होत पर्यंत सुरूच राहणार असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार आंदोलकाची संख्या दहा ते पंधरा हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे.
जनआक्रोश ठिय्या आंदोलन देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार यांच्या मार्गर्शनाखाली व गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष जगन येलके यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत