चंद्रपूर जिल्ह्यात तणसीच्या ढिगाऱ्याला भिषण आग #chandrapur #pombhurna #fire #firenews #Adharnewsnetwork


१८ बंड्या तणीस, १६ पिव्हीसी पाईप जळून खाक

पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील गावाच्या मध्यभागी असलेल्या कवडू ढुमने या शेतकऱ्याच्या सांदवळीतील तणसीच्या ढिगाऱ्याला रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.यात १८ बंड्या तणीस व १६ पीव्हीसी पाईप जळून खाक झाले.यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या समय सुचकतेमुळे वेळीच आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने आग गावात पसरली नाही.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील कवडू ढुमने यांची गावाच्या मध्यभागी असलेल्या सांदवाडीत बैलाच्या चाऱ्यासाठी १८ बंड्या तणीस ठेवण्यात आली होती. रविवारला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली यात तणसीचा ढिगारा जळून खाक झाला.ढिगाऱ्या जवळ ठेवून असलेले १६ पीव्हीसी पाइपही जळून खाक झाले.यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागली याची माहिती गावकऱ्यांना मिळताच तातडीने आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले यामुळे सदर आग गावात पसरली नाही.आणि आगिमुळे होणारा मोठा अनर्थ टळला.शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने तात्काळ द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत