Top News

ट्रकला ओव्हरटेक करताना पलटली कार #chandrapur #warora #accident


एक ठार, चार जण जखमी


वरोरा:- नागपूर येथून चंद्रपूरकडे कारने जात असताना ट्रकला ओव्हरटेक करताना कार पलटी झाली. यामध्ये कारमधील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. ही घटना चंद्रपूर-नागपूर मार्गावरील पिंपळगाव शिवारात रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. सौरभ गिरीश चोपडे (३२), छत्रपतीनगर तुकूम, चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

एमएच ३१ डीसी १०८६ या क्रमांकाच्या कारने सौरभ गिरीश चोपडे (32) रा. छत्रपतीनगर चंद्रपूर. लक्ष्मीकांत अवधूत बेहेरे (३४) रा. तुकुम चंद्रपूर, शुभम उत्तम घागरगुंडे (३२) रा. एमआयडीसी चंद्रपूर, निलय यतीन पातूरकर (२३) रा. तुकुम, सौरभ शंकर मडावी (२३) रा. कोसारा हे सर्व जण कारने नागपूर येथून चंद्रपूरकडे येत होते. दरम्यान, नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव शिवारात ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार पलटली. या अपघातात सौरभ गिरीश चोपडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर जखमींवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार करण्यात आले. सौरभ शंकर मडावी याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने