बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील चुनाभट्टी परिसरात उभे असलेले लोखंडी वीज खांब गॅस सिलिंडरने कापून नेले जात होते. याचा सुगावा जवळच असलेल्या खेळाच्या मैदानात असलेल्या तरुणांना लागला. त्यांनी माहिती विसापूर पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल व विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पाठविले. दरम्यान लोखंडी वीज खांब चोरी करणारी टोळी फरार झाली. त्या टोळीने मोटार सायकल, गॅस सिलिंडर व अन्य साहित्य टाकून पळ काढला. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले. ही घटना बल्लारपूर - चंद्रपूर राज्य महामार्गांवरील चुनाभट्टी येथे शनिवारी रात्री १०.४५ वाजता उघडकीस आली. An attempt to steal an iron electricity pole failed
विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील चुनाभट्टी येथे मजुरांची वस्ती आहे. पूर्वी चुनाभट्टी सुरु असताना वीज जोडणीसाठी लोखंडी खांब टाकले होते. मात्र आजघडीला त्या लोखंडी खांबावर वीज जोडणी तार नाही. तेथील वीज लोखंडी खांब गॅस सिलिंडरच्या साहाय्याने कापून नेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. रात्रीच्या गडद अंधारात उजेड दिसून येत होता. जंगलात आग लागली असावी म्हणून चुनाभट्टी येथील तरुणांच्या लक्षात आले. त्या दिशेनी चार, पाच तरुणांनी धाव घेतली. त्यावेळी त्या तरुणांना धक्कादायक प्रकार लक्षात आला. चार, पाचच्या संख्येतील लोखंडी वीज खांब कापून चोरी करणारी टोळी अवाक झाली.
लोखंडी वीज खांब चोरी करणाऱ्या टोळीने त्या तरुणांची विनवणी केली. त्यांनी पैशांची तरुणांना लालूच दाखवली. मात्र हा प्रकार गंभीर आहे, म्हणून चुनाभट्टी येथील ग्रामपंचायत सदस्य सरोज केकती यांनी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उमेश पाटील यांनी संतोष दंडेवार, प्रविण सोनटक्के, विलास खरात, जमादार जीवन पाल, कैलास चिंचोलकर, होमगार्ड रामप्रताप निषाद यांचे पथक घटनास्थळी पाठविले.
पोलिसांनी दुचाकी वाहन क्रमांक - एम. एच.१२, पी. डी. २६८०, दोन गॅस सिलिंडर, व अन्य लोखंडी वीज खांब कापण्याचे साहित्य जप्त केले आहे. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात केला जात असून लोखंडी वीज खांब चोरी करणाऱ्या टोळीच्या मागावर पोलीस आहेत.zr
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत