चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ परीक्षेला ९ मे पासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली उन्हाळी परीक्षा 2023 वेळापत्रक पहा एका क्लिकवर..
विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर जिह्यात ४३ आणि गडचिरोली जिल्ह्यात २४ असे एकूण ६७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. पदव्युत्तर पदवीकरिता १६हजार ७५३ तर पदवी परीक्षेकरिता ७५ हजार३३६ असे एकूण ९२, ०८९विद्यार्थी उन्हाळी परीक्षांकरिता प्रविष्ट होणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली, आल्लापल्ली, मूलचेरा, सिरोंचा, मालेवाडा ही आठ परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील आहेत. असे संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ. अनिल चिताडे यांनी कळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत