चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना शनिवार दिनांक 6 मे 2023 चे रात्रौ 8 वाजताच्या दरम्यान घडली यात शहर पोलिसांनी 4 युवकांना अटक केली असून 3 युवक फरार आहेत.
घुटकाळा वार्डात दुचाकीवर बसल्याने दोन युवकात शाब्दिक वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही युवकांनी आपल्या मित्रांची गॅंग बोलवून एकमेकांना मारण्याचा बेत आखला यामुळे घुटकाळा परिसरात दोन गटात जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली.
घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तन्वीर नसरुद्दीन काझी, सचिन नंदनवार, सूफीयान सादक अली व शाहरुख काजी या चार युवकांना अटक करण्यात आली असून 3 आरोपी फरार आहेत आरोपींवर 326, 294, 143, 144, 149, 506, 427 भांदवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत