गणपती वार्डातील नागरिकांच्या हाकेला धावून आले पालकमंत्री #chandrapur
Google ads.
बल्लारपूर:- दिनांक :- 07 मे 2023 (रविवार)
रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी गणपती वार्डातील रेल्वेच्या हद्दीत आलेल्या काही नागरिकांच्या घराची मोजणी करण्यात आली ज्यामध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांच्या घरांचा समावेश असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्याशी सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रामध्ये संपर्क साधला.


चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी PWD विश्रामगृह बल्लारपूर येथे गणपती वार्डातील नागरिकांसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून लवकरच यावर योग्य मार्ग काढू असे सांगून मोबाईलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब तसेच स्थानिक तहसीलदार यांना गणपती वार्डाचा पुन्हा सर्वे करून या विषयांमध्ये नागरिकांना काय योग्य मदत करता येईल ती मदत तात्काळ करण्याचे आदेश दिले त्यानंतर नागरिकांनी माननीय सुधीर भाऊंचे आभार मानले.


याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, नगरसेवक येल्लय्या दासरफ, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे, युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक श्रवण मोगरम, भाजयुमो विद्यार्थी आघाडी बल्लारपूर विधानसभा संयोजक हार्दिक खाडिलकर, चंद्रपूर विधानसभा संयोजक तेजस अलवार, तसेच गणपती वार्डातील सर्व सन्माननीय नागरिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत