चंद्रपूर:- पोलीस स्टेशन, रामनगर यांचेकडुन पोस्टे रामनगर हद्दीतील तसेच चंद्रपुर शहरातील सर्व नागरीकांना आव्हाण करण्यात येते की, सध्या लग्न समारंभ तसेच मुलांच्या शाळेच्या सुट्या सुरू असुन बस स्टॉफ, रेल्वे स्टेशन, ऑटो मध्ये मोठया प्रमाणात गर्दी असल्याचे दिसुन येत आहे. सदर गर्दीचा फायदा घेवुन बॅग, पर्स तसेच पॉकेट मधील सोन्याचे दागीने तसेच रोख रक्कम चोरी करणारे महिला आरोपीतांची टोळी सक्रिय झाली असल्याचे दिसुन येत आहे.
पर्स, बॅग तसेच पॉकेट मधुन सोन्याचे दागीने तसेच रोख रक्कम चोरी जाण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी सर्व नागरीक हे गर्दीच्या ठिकाणी, ऑटोमध्ये, बसमध्ये, बस स्टॉफवर आप आपले बॅग, पर्स तसेच पॉकेटकडे लक्ष ठेवुन काळजी घेवुन सतर्क राहावे. करीता आवाहन करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत