https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO सुशीलकुमार नायक यांची जळगाव येथील बदली झाली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर 11 में 2023 रोजी अज्ञात आरोपींनी गोळी झाडली होती.यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खडबड उडाली.या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत होता सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर सुद्धा आरोपी पोलिसांना गवसत नव्हते.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीत 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यामुळे तपासाची सूत्रे SDPO सुशीलकुमार नायक यांच्याकडे सोपवण्यात आली होती.तपासाची सूत्रे हाती घेताच नायक यांनी वेगळ्या दिशेने तपास सुरू केला.त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व जलदगतीने तपास करून 2 आरोपींना गजाआड केले आहे.
सुशील कुमार नायक यांची बदली जळगाव तर राजुऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांची उमरेड तसेच ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांची शहापूर येथे बदली करण्यात आहे.राज्य गृह विभागाकडून या बदल्या करण्यात आल्या आहे.