पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील ग्राम पंचायत चेक आष्टा येथील शिपाई पदभरती नियमबाह्य होत असल्यामुळे शिपाई पदभरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हि पदभरती रद्द करुण चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
ग्राम पंचायत चेक आष्टा येथे होत असलेल्या शिपाई पदभरती राबवित असतांना जुने अर्ज कायम ठेवून नविन अर्ज न बोलता व नविन जाहिरात काढून नवीन अर्ज बोलवण्यात आले व त्या अजांची छाननी करीत असतांना जाहिरातीतील नियम बाजूला करुण आपल्या मनमानीने अर्जाची छाननी करुन १२ अर्जापैकी ७ अर्ज बाद करण्यात आले व पात्र, अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली. शुल्लक कारणाने ७ अर्ज बाद करुन त्यांच्यावर अन्याय होत आहे. तरी आपण चौकशी करुण सर्व उमेदवारांना योग्य न्याय द्यावे. अशी मागणी गावातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्राम पंचायत ने शिपाई पदभरती प्रक्रीया न थांबवल्यास सर्व नागरीक ग्राम पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करीता बसत असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तरी आपल्या स्तरावरुन त्यांना पदभरती प्रक्रीया थांबवुन चौकशीचे आदेश देण्यात यावे हि मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य जयंत पिंपळशेंडे, भुमिस्वामी कुंभरे, खुशाल कुंभरे आदी उपस्थित होते.
चेक आष्टा ग्रामपंचायत शिपाई भरती संदर्भात जाहिरात काढण्यात आली. त्या जाहिरातीमधील अटी व शर्तीनुसार उमेदवारांचे फॉर्म मागविण्यात आले होते. यात एकूण बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बहुमतानुसार उमेदवाराच्या पात्र अपात्र बाबतची छाननी करण्यात आली. यात ०५ उमेदवार पात्र झाले तर ०७ अपात्र ठरले आहेत.
ग्रामसेवक मनोज मुडावार
ग्रामपंचायत चेक आष्टा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत