धान खरेदी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ #chandrapur #DIOchandrapur


नोंदणीसाठी शेतकऱ्यांची उपस्थिती बंधनकारक

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- पणन हंगाम 2022-23 रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2022-23 पासून ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे.

धान खरेदीकरीता एन.ई.एम.एल पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील 35 खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत