धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे भैरव दिवसे यांचा सत्कार #chandrapur #pombhurna #gadchiroli


गुणवंत गौरव सत्कार सोहळा-२०२३ संपन्न

चंद्रपूर:- समाजातील बांधवांमध्ये दातृत्व भावना असेल तरच समाजाचा विकास होतो. त्यासाठी समाजाने एकसंघ राहून काम करणे आवश्यक असल्याचे मत धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगरचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांनी व्यक्त केले. दि. २५ जून ला समाज मंदिर सभागृहात आयोजित गुणवंत सत्कार व गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव दिवसे या युवकांने क्रिडाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने धनोजे कुणबी समाज मंडळाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आले. पोंभुर्णां तालूक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे यांने बंगलोर येथे सेस्टोबॉल खेळात कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्र टीम मध्ये होता. यात महाराष्ट्र टिमने कांस्यपदक पटकावले, सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आर) 4 थी सिनिअर व 4 थी ज्युनिअर राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन 30 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूल, बंगलोर दक्षिण कर्नाटक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सिनिअर मुले व सिनिअर मुली यांनी कांस्य पदक पटकाविले होते. यात भैरव दिवसेंचा समावेश होता. भैरवने क्रिडा क्षेत्रात केलेली कामगिरी लक्षात घेऊन धनोजे कुणबी समाज मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी उद्घाटन डॉ. सुरेश महाकुलकर, मुख्य अतिथी म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा अशोक जीवतोडे, मार्गदर्शक डॉ. दुर्गाप्रसाद बनकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पुष्पा पोडे पाचभाई, सीमा अडबाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंद पोडे, अंबर जीवतोडे, रोहिणी जीवतोडे, मंडळाचे उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, सचिव अतुल देऊळकर, सहसचिव प्रा. नामदेव मोरे, सल्लागार मनोहर पाऊणकर, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सदस्य भाऊराव झाडे, सुधाकर जोगी, महेश खंगार, डॉ. मीना माथनकर, नीता पावडे आदींची या वेळी उपस्थिती होती.

या वेळी मुख्य मार्गदर्शक बनकर यांनी विद्यार्थ्यांनी मनात जिद्द ठेवून सतत प्रयत्न करीत राहिल्यास यश निश्चित प्राप्त होईल. शिवाय विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावून जीवनात यशस्वी व्हावे, असा सल्ला दिला.

या वेळी दहावी तसेच बारावीतील गुणवंत तसेच पीएच.डी.धारक, नेट-सेट उत्तीर्ण, फेलोशिपधारक, उपक्रमशील शेतकरी, खेळाडू यांचा विशेष सत्कार जनता करिअर लाँचरतर्फे करण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पुष्पा पावडे यांचा समाज मंडळाकडून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नामदेव मोरे, तर आभारप्रदर्शन सुधाकर जोगी यांनी केले. या वेळी दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या