सात बहिणी डोंगरावर पुन्हा मधमाशांचा हल्ला; २५ पर्यटक जखमी #chandrapur #nagbeed


नागभीड:- नागपूरची टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी येथील स्थानिक लोकांशी संगनमत करून लोकांना ट्रॅकिंगसाठी नागभीडला घेऊन येथे असते. नागभीड तालुक्यातील सात बहिणी डोंगरावर (सेव्हन सिस्टर हिल) येथे आलेल्या पर्यटकावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात 25 पर्यटक जखमी झाले आहेत. सर्व जखमी नागपूर येथील रहिवासी आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमींपैकी काही पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे. शंकरपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अनेक जखमी नागपुरात गेलेत. या पूर्वीही हल्ल्याचा अनेकदा घटना घडल्या आहेत.


काही दिवसांपूर्वीच येथे आलेल्या उमरेड आणि नागपूर येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी हल्ला केल्याने बेशुद्धावस्थेत वाचवण्यात आले. गडचिरोलीतील काही पर्यटकांवरही मधमाश्यांनी हल्ला केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या