एनआयएस सॉफ्टबॉल प्रशिक्षणात कोमल शेंडे द्वितीय #chandrapur #bramhapuri


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- ८ मे ते २८ जून २०२३ दरम्यान संपन्न झालेल्या नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स पतियाळा द्वारा आयोजित ६ आठवड्याच्या प्रशिक्षक सॉफ्टबॉल प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमात ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन येथील कोमल पंढरी शेंडे यांने संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय स्थान मिळवले आहे. कोमल संयुक्त द्वितीय असून त्याच्या सह प्रियांका बघेल दिल्ली हिने सुध्दा संयुक्त द्वितीय स्थान मिळवले आहे.
गोंडवाना विद्यापीठातून अनेकवेळा विजेतेपद मिळवलेला कोमलने विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल चमुचा प्रशिक्षक म्हणून सुध्दा अनेकवेळा काम केले आहे. विद्यापिठांतर्गत सॉफ्टबॉल स्पर्धा आयोजन, पंचगिरी, निवडसमिती सदस्य अशा अनेक भूमिका त्याने योग्यरीतीने वठवलेल्या आहेत.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेज कॉन्व्हेंट मधुन कोमल आणि त्याचे सहकारी यांनी सॉफ्टबॉलचे निशुल्क प्रशिक्षण देत सॉफ्टबॉल प्रचार प्रसाराचे कार्य सुरुच आहे. मागील वर्षी गांधीनगर गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स मधे कोमलची तांत्रिक अधिकारी पंच गुणलेखक म्हणून निवड झाली होती. त्याने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धांमध्ये सुध्दा पंच म्हणून चांगले कार्य केलेले आहे.

संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य स्पर्धेतही पंच म्हणून तो सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे.बेसबॉल ५ या नव्या खेळातसुध्दा कोमल राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ पंच म्हणून ओळखला जातो आहे. आता एक प्रमाणित सॉफ्टबॉल प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करायला तयार असलेल्या कोमल पंढरी शेंडे यांचे वर अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने