वरोरा:- दिनांक 29/06/2023 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवनियुक्त वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख रमेश राजुरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वरोरा येथील विठ्ठल मंदिरात जाऊन विठू माऊली चे दर्शन घेतले. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळो अशी विठू माऊली चरणी प्रार्थना केली.
तसेच माजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला हर अर्पण करून महा जनसंपर्क अभियान मोदी Modi@९ ची वरोरा शहरात सुरुवात केली. "घर चलो अभियान" मध्ये समस्त जनतेची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेल्या कामाचा आढावा सादर केला पुन्हा 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वात सरकारला प्रचंड बहुमताने विजयी करून देण्याचे आवाहन केले.
यावेळी भगवान गायकवाड, करण देवतळे, सुरेश महाजन, बाबासाहेब बागडे, राजूभाऊ दोडके, विशाल पारखी डॉ. सागर वझे, दिलीप घोरपडे, शुभम चांभारे, राहुल बांदूरकर, संगीता निंबाळकर, सायरा शेख व टीम बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जानता महिला आघाडी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत