चंद्रपूर जिल्ह्यातील स्मशानभूमीत नागरिकांवर मधमाशांचा हल्ला



चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरातील स्मशानभूमीत मधमाश्यांचा हल्ला झालाची घटना घडली. मृतदेह सरनावर ठेवत असतानाच मधमाशांनी हल्ला केल्याने अंतयात्रेतील ४२ नागरिक जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.  चंद्रपूर जिल्ह्यात मधमाशांनी हल्ला केल्याची ही दुसरी घटना आहे.

सिंदेवाही शहरातील महाकाली नगरी परिसरात राहणारे राजू मार्तंडवार यांचे निधन झाले. त्यांची प्रेतयात्रा दुपारच्या वेळेस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करिता नेण्यात आली. स्मशानभूमीतील सरण रचले गेले व विधी सुरू झाली होती. त्यानंतर मृतकाच्या प्रेताला अग्नी द्यायची बाकी असताना मधमाशांनी हल्ला केला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नातेवाईक, नागरिकांनी, महिला, पुरुष, लहान मुले यांची पळापळ झाली. काही नातेवाईकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने जखमी झालेत. 

  मधमाशांचे काटे अंगाला, मांडीला, हाताला, मानेला चावा घेऊन रुतलेले होते. मधमाशांनी भरपूर जणांना चावा घेतला. मृतकाचे सरनावरचे रचलेले प्रेत तसेच ठेवलेले होते. सर्वांनी मिळेल तिथे आसरा घेतला व वाहने सोडून लांबवर उभे राहून लक्ष देत राहिले. स्मशानभूमीच्या परिसरात मधमाशांचा वावर सुरूच होता. या हल्ल्यात जखमी झालेल्याना ग्रामीण रुग्णालयात   उपचाराकरिता हलविण्यात आले आहे‌. या हल्ल्यात चंदू श्रीकुंडवार, प्रदीप अटकापूरवार हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार चार वाजता करण्यात आले.

हेही वाचा

उड्डाणपूल संदर्भात व्यापारी आक्रमक    

कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष देवतळे म्हणाले, 'राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे न्याय मागणार'

जपून वापरा स्मार्टफोन! नाहीतर जावे लागेल तुरुंगात?*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत