नानाजी तुपट यांचा राजीनामा जिल्हाध्यक्षाने केला नामंजूर #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

ब्रम्हपुरी काँग्रेस मध्ये गटबाजी सक्रिय?

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांचा राजीनामा जिल्हा काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी नानाजी दुप्पट यांचा राजीनामा नामंजूर केला असून किसान सेलच्या अध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरिता कायम ठेवले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पार पडला प्रेमी युगलांचा 'शुभमंगल सावधान!'

किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदान दिनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्यावर पक्षात मनमानी करत असल्याचा आरोप करत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. बाजार समितीचा निकाल लागताच तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी नानाजी तुपट हे पक्षात आल्यानंतर पक्ष संघटनेकरिता सक्रिय कार्य करत नसल्याने व बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षाचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत राजीनामा मंजूर करून पक्षश्रेष्ठी कडे पाठविला होता व लवकरच नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचे तिडके यांनी प्रसिद्धी पत्रातून कळविले होते. यानंतर यांनी पत्रकार परिषद घेऊन तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्या तक्रारीचा पाढा वाचत तालुकाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी केली होती.

ब्रम्हपुरी तालुका आधार न्युज नेटवर्क What'sup group


तिडके व तुपट यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेस गोटात वर्चस्वावरून वरून कलह दिसून आला.जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी नानाजी तुपट यांचा राजीनामा नामंजूर करून पक्षाच्या बळकटी करिता व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता किसान सेलचे अध्यक्ष पद कायम ठेवत नियुक्ती पत्र नानाजी तुपट यांना दिले आहे. सहसा निवडणूक हरल्यावर पक्षात चिंतन सुरू असते मात्र निवडणूक जिंकल्यावर ब्रम्हपुरी काँग्रेस चिंतनात सापडल्याचे दृश्य आहे.


हेही वाचा

उड्डाणपूल संदर्भात व्यापारी आक्रमक    

कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष देवतळे म्हणाले, 'राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे न्याय मागणार'

जपून वापरा स्मार्टफोन! नाहीतर जावे लागेल तुरुंगात?

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)