Top News

पर्यटकांवर मधमाशांनी केला हल्ला; दोन जण ठार, पाच जखमी #chandrapur #gadchiroli #nagbeed #forestdepartment #bee


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षण केंद्र आणि तळोधी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर पर्यटनासाठी आलेल्या नागपूरच्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यामध्ये काही महिला आणि सहा 6 महिन्यांची चिमुरडी आहे, जखमींची नावे कळू शकलेली नाहीत. तर नागपूरचे रहिवासी अशोक विभीषण मेंढे (६२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुलाबराव पोचे (५८) यांना डोंगर संकुलातून गंभीर अवस्थेत वाचवताना वाटेतच मृत्यू झाला. News Chandrapur breaking Maharashtra India tourist place area

ही घटना शनिवारी दुपारी 2:00 वा 3:00 वाजेच्या सुमारास घडली असण्याची शक्यता आहे. सायंकाळी वनविभागाला याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी वनविभागाच्या टीम अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तळोधी, नागभीड पोलीस व स्वाब नेचर केअर संस्थेचे पदाधिकारी व सदस्य घटनास्थळी पोहोचले व बेपत्ता गुलाबराव पोचे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, नंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत शोधून डोंगरावरून खाली रुग्णवाहिकेत नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

तर वरील डोंगरावर मधमाशांच्या दंशामुळे अशोक मेंढे यांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रात्री 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. पुढील तपास तळोधी पोलीस व तळोधी वनविभाग करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने