आज अर्जूमन शेख यांच्या साहित्यावर चर्चासत्र #chandrapur


चंद्रपूर:- संवेदनशील कवयित्री आणि कथालेखिका अर्जुमन शेख यांच्या सांजरंगी सावल्या या कवितासंग्रहावर आणि जुबेदा मंजिल या अतिशय लघु कथासंग्रहावर सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने आज रविवार दिनांक ९ एप्रिलला जयंत टॉकीज परिसरातील मृणालिनी सेलिब्रेशन येथे सायंकाळी ६ वाजता चर्चासत्र आयोजित आहे.


ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या चर्चासत्रात प्रसिद्ध कवी तथा लेखक डॉ. विद्याधर बनसोड कथेवर आपले मत मांडतील तर भद्रावतीचे समीक्षक डॉ. सुधीर मोते अर्जुमन शेख यांच्या कवितेवर भाष्य करतील. अर्जुमन यांच्या निवडक कथांचे अभिवाचन नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुमेधा श्रीरामे, स्निग्धा हस्तक आणि उज्वला वानखेडे करतील तर निवडक कवितांचे अभिवाचन नाट्य कलावंत संजय रामटेके करतील. चर्चासत्राला साहित्यरसिकांनी व काव्यप्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिव इरफान शेख, प्रदीप देशमुख यांचेसह संस्था सदस्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत