Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा हल्ला #chandrapur #Warora


सैरावैरा पळताना १५ जण जखमी


वरोरा:- गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सरण रचण्यात आले. त्याचवेळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यामुळे एकच धावपळ झाली. मधमाशांच्या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना वरोरा तालुक्यात येणाऱ्या चिंचाळा गावात घडली.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचाळा या गावातील विजय चांदनबटवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता चिंचाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरु होते. स्मशानभूमी परिसरात मधमाशांचे पोळं होतं. या पोळ्यातील मधमाशांनी अचानक अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवर हल्ला चढविला.

या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. मधमाशांच्या या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले आहेत. जखामितील नीतेश वाटोरे, ईश्वर बनसोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तुळशीराम आगलावे, सुरेश टेकाम, विरेंद्र चंदेल, अशोक भावराव चांदनबटवे, धनराज सुखदेव चांदनबटवे, गणेश देवराव नक्षिने, ईश्वर पावडे, नामदेव संभा दडमल, गणपत दडमल, शालिक वडार हे किरकोळ जखमी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत