Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बेपत्ता

Bhairav Diwase

कोरपना:- पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खू येथील शिक्षक अजय विधाते  बुधवार सकाळपासून बेपत्ता झाले आहे. गेले तीन दिवसापासून शोधाशोध करून ही त्यांचा अजूनही पत्ता लागला नाही.

अजय लटारी विधाते ( ३९ ) हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडशी येथे कार्यरत आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैन ले आऊट परिसरात वास्तव्यास राहतात. बुधवार दिनांक १९ जुलै ला सकाळी नऊ वाजता फिरायला जातो म्हणून मोटर सायकलने घरून निघाले. त्यानंतर ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्यांचा थांगपत्ता न लागल्याने शेवटी त्यांच्या वडिलांनी दिनांक २० जुलैला वणी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान त्यांची मोटरसायकल वर्धा नदीच्या पुलावर आढळून आली. या अनुषंगाने वर्धा नदीच्या पात्रात शोध मोहीम राबवली जात आहे. परंतु बेपत्ता शिक्षकाबद्दल कुठलीच माहिती समोरून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.