प्रश्नांची उत्तरे लिहून सुध्दा विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण?

Bhairav Diwase
0
गोंडवाना विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासली नाहीत का? विद्यार्थ्याचा सवाल

गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत महाविद्यालयांती अनेक सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. या परीक्षेतील अनेक पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या उन्हाळी परीक्षा मे महिन्यात घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाले. महाविद्यालयातर्फे पाठविण्यात आलेले अंतर्गत गुण हे गुणपत्रिकेवर अचूक आले. मात्र, लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी अनेक विद्यार्थ्यांना केवळ शून्य ते पाच गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शून्य गुणदान पद्धतीने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार आहे. महाविद्यालयाने या संदर्भात तातडीने विद्यापीठाला कळवावे. याप्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गोंडवाना विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासली नाहीत का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठाने याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)