शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल #chandrapur

Bhairav Diwase
0

रेती कंत्राटदाराला मारहाण आली अंगलट
चंद्रपूर:- रेती टाकण्यावरून झालेल्या वादात शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाने रेती व्यवसाय करणाऱ्या कंत्राटदारास मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे घडली.

याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, गणेश ठाकूर, मोनीत बेले यांच्यावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच त्यांचे चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.

जितू चावला हा रेती कंत्राटदार असून, तो रेती विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे व चावला यांच्यात रेतीवरून वाद झाला. दरम्यान, वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे जितू चावला उभा होता. संदीप गिऱ्हे चारचाकी वाहनाने तिथे गेला. त्याने चावला यांच्याशी कमी पैशात रेती का टाकतोस या कारणातून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी आपल्या सहकाऱ्यासह त्याला मारहाणही केली, अशी तक्रार चावला यांने नरामनगर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.

पुढील तपास रामनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खाडे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)