गोंडपिपरी:- छत्तीसगडच्या इंद्रावती टायगर रिझर्व येथे वनपथकाने जप्त केलेल्या वाघाचे चामड्याचे कनेक्शन चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.
छत्तीसगडच्या वनपथकाने गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील धर्मा नानाजी चापले याला अटक करण्यात आली आहे. त्याला चौकशीसाठी छत्तीसगड येथे नेण्यात आले आहे. आंतरराज्यीय तस्करांचे तार गोंडपिपरीत आढळल्याने चंद्रपूर वनविभागासुध्दा सतर्क झाला आहे.