वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार #chandrapur #nagbeed


नागभीड:- नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गंगासागर हेटी बीट कक्ष क्रमांक 2 मध्ये स्वतःच्या शेतात तुळी लावण्याचे काम करीत असलेल्या शेतकरी महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून महिलेला फरकळत नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. दुर्गा जीवन चनफने (वय 47 ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून ती आकापूर येथील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्त असे की, दररोज च्या प्रमाणे दुर्गा चनफने ही विधवा महिला स्वतःच्या शेतात बुधवारी तुळी लावायला गेली होती. मात्र पट्ठेदार वाघाने अचानक दुर्गावर हल्ला करून तिला ओढत दूर घेऊन गेला. सायंकाळचे 7 वाजले तरी सुद्धा आई घरी परतली नाही म्हणून मुलगा शेतात गेला. शेतात त्याला वाघाचे ठसे दिसले. आणि शिदोरीचे डब्बा, साडी पडलेली व रक्त दिसला. तो घाबरलेल्या अवस्थेत गावात आला. आणि गावकऱ्यांना सांगितले. शंभराहून अधिक नागरिक शेतात आले शोधाशोध सुरु केली असता रात्री उशिरापर्यंत तिचा मृतदेह उश्राळा तलावाच्या शेतापासून 400 फुटा पर्यंत जंगल भागात तिला ओढत नेऊन मुंडके धडापासून वेगळे झालेल्या अवस्थेत मिळाला.
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी तळोधी वनपरीक्षेत्राचे प्रभारी अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक वाळके, वनरक्षक एस.एस. कुळमेथे, तळोधी बा स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश भोयर,उपनिरीक्षक गोवर्धन यांच्या समक्ष पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकारिता रात्रीच नागभीड येथे पाठविण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने