विद्युत स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

ब्रम्हपुरी:- विद्युत स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दि.12 जुलै ला दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास बरडकिन्ही येथे घडली. जसवंत पांडुरंग मिसार (50) असे मृतकाचे नाव असून ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही गावातील रहिवासी आहे. (Farmer dies due to electrocution)

प्राप्त माहितीनुसार शेतकरी जसवंत यांच्या शेतामध्ये धान रोवणीचे काम सुरु असून विहिरी मधून विद्युत पंपाद्वारे शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरु करायला गेला असतां विद्युत स्पर्शाचा जब्बर धक्का हाताला बसला त्यामध्ये शेतकरी जसवंत हा जागिच खाली पडला. काहीं वेळ विहीरी जवळच पडून राहिला.वडील जसवंत आला नाही म्हणुन मुलगा हा विहिरीजवळ गेला असतां मुलाला वडील जसवंत हा खाली पडला दिसला.दिसताक्षणिक प्राथमिक उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे नेण्यात आले तेव्हा खुप उशीर झाल्याने शेतकरी जसवंतची प्राणज्योत मावळली असे वैधकिय अधिकारी यानी माहिती कुटुंबाला दली.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस पडत आहे. मात्र दोन तीन दिवस झाले पावसाने दडी मारल्याने विद्युत पंप च्या साह्याने विहिरमधून पाणी काढून शेतकरी धान रोवणी चे काम सुरु केले आहे. त्यातच शेतकरी जसवंत ने सुद्धा धनापिक रोवनी करण्यासाठी विहिरीतील पाणी काढण्यासाठी विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेला असता शेतकरी जसवंतच्या हाताला विद्युत स्पर्श झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

शेतकरी जसवंतच्या पच्छात्य पत्नी एक मुलगा एक मुलगी असा कुटूंब असून घरचा कर्ता शेतकरी जसवंत असल्यामुळे मीसार कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळले आहे. मिसार कुटूंब तथा शेतकरी जसवंत हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्यामुळे गाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे. तसेच मृतक शेतकरी जसवंतला उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास संबधित विभाग करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)