मराठा समाजाला" कुणबी " प्रमाणपत्र देण्यास विरोध


राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे इशारा

🌆
चिमूर:- जालणा जिल्ह्यातील आतरवली सराटे या गावी आरक्षणाचा मागणी साठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले. तरिही सरकारणे आंदोलन व उपोषणाच्या दबावाखाली मराठ्यांना' कूणबी' जातीचे दाखले देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे केल्यास ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना खुल्या वर्गातून EVS चे आरक्षण मिळतच आहे. किवा ते वाढवावे. आजवरच्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने मराठा व कुणबी एकच नसल्याचे मान्य केले. त्यामुळे राज्य सरकारने मराठा नेत्यांच्या दबावात येऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये.
🌆

असे केल्यास ओबीसी समाज भारतभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर च्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत देण्यात आले.

🌆
 यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मारोतराव अतकरे, मोरेश्वर झाडे, रामदास कामडी, कवडू लोहकरे, किर्ती रोकडे, राजू लोणारे , ममता डुकरे, पुष्पा हरणे, मिनाक्षी बंडे, सुनिता चौधरी, भावना बावणकर, प्रभाकरराव पिसे, प्रभाकरराव लोथे, रामभाऊ खडसिंगे, वैभव ठाकरे, यामीनी कामडी, धर्मदास पानसे, श्रीकृष्ण जिल्हारे, मिना चौधरी, दुर्गा चावरे, रुपाली घ्यार, रजणी भुजाडे, वर्षा शेंडे, कवडू निकेसर, अजित सुकारे, शांतकला घ्यार , समीर बल्की आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या