Top News

सोयाबिन पिकांवर रोग आल्याने शेतकरी सापडला संकटात. Chandrapur chimur


शिवसेनाच्या वतीने शेतकरी बांधवांनी चिमूर तहसिल कार्यालय येथे दिले निवेदन
🌃
चिमूर :- चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबिन पिकांवर रोग आल्याने शेतकऱ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी शिवसेनेच्या मार्फत चिमूर तहसिल कार्यालय येथे निवेदन सादर केले. चिमूर तालुक्यातील पुयारदंड तसेच तालुक्यातील इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबिन पिकांवर अॅलो मौज्याक नावाचा रोग आला आहे. या रोगामुळे शेतातील सोयाबिन पिके जमिन दोस्त होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हाती येणारा सोयाबिन माल हातातुन जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
🌃

संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या पिकांची चौकशी करून चिमूर तालुक्यातील पुयारदंड व तालुक्यातील इतर गावातील सोयाबिन पिकांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ पंचनामे करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. यावेळी शिवसैनिक समीर बल्की, गजानन राऊत उसरपंच, वैभव ठाकरे, कमलाकर बोरकर, चंद्रशेखर नागेकर, विकास गवडी, चेतन पिचकाटे, नरेश राऊत, सुरेश गवळी, चंद्रशेखर नागेकर, राहुल फलके, मोरेश्वर झाडें हैशल वठाणे, अभिजित गावडे, भुसन वानखेडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने