विनोद मारोती देशमुख हे सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- दि. १०सप्टेंबर २०२३ रोजी रविवारला आनंदवन वरोरा येथे " निजबल हाॅल, संधी निकेतन, अपंगाची कर्मशाळा आनंदवन वरोरा येथे झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर ( ग्रामीण) व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा यांचे सौजन्याने झाडी शब्दसाधक पुरस्कार आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कार सोहळा उद्घाटक डाॅ. विकास आमटे सचिव महारोगी सेवा संस्थान आनंदवन, अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर झाडीबोली साहित्य मंडळ सदस्य केंद्रीय शाखा साकोली, विशेष अतिथी झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाट्य कलावंत पद्मश्री पुरस्कार प्राप्त डाॅ. परशुराम खुणे, आचार्य ना. गो. थुटे,  सुधाकर कडू महारोगी सेवा समिती सदस्य, अरुण झगडकर अध्यक्ष झा. सा. मं. चंद्रपूर, सौ.रत्नमालाताई भोयर महिलाध्यक्ष झा. सा. मं. चंद्रपूर, पंडीत लोंढे अध्यक्ष झा. सा.मं. शाखा वरोरा यांचे उपस्थितीत पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन व लोकार्पण हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. 

        या कार्यक्रमात सामाजिक दायित्व जोपासणारे, हिरहीरीने मदतीच्या एक हाकेला धावणारे, जनतेचे मदतगार विनोद मारोती देशमुख माजी सभापती पंचायत समिती सदस्य पोंभुर्णा यांना "सामाजिक कार्य गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

            या पुरास्काराबद्दल त्यांच्यावर सर्वांकडून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांना सदैव नि:स्वार्थ सामाजिक कार्याची ग्वाही देत राहील. हा पुरस्कार निश्चितच त्यांना नवी दिशा आणि ऊर्जा देण्यास प्रेरणादायी ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)