सरदार पटेल महाविद्यालयात ‘ओझोन दिन’ साजरा
चंद्रपूर:- ‘ओझोन दिन’ हा पर्यावरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असे सांगत वातावरणातील ओझोनचे सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरत असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी येथे बोलताना केले.
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्याने ‘केमिकल सोसायटी’चे उद्घाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. उपप्राचार्य डॉ. एस.व्ही.माधमशेट्टीवार, ‘केमिकल सोसायटी’चे समन्वयक डॉ. डी.एस.वाहणे, डॉ. व्ही.डी.खनके, डॉ. आर. पी. धनकर, सहाय्यक समन्वयक डॉ. प्रणव मंडल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जीवनातील यशासाठी स्पर्धेचे महत्त्व अन्यन्यसाधारण असून महाविद्यालय व परिसरात उपलब्ध असलेल्या सुविधांचा उल्लेख डॉ काटकर यांनी यावेळी केला. उपप्राचार्य डॉ. माधमशेट्टीवार यांनी रसायनशास्त्र विभाग आणि ‘केमिकल सोसायटी’च्या सुरुवातीपासूनच्या प्रवासावर प्रकाश टाकला.
जागतिक ओझोन दिन’ निमित्याने ‘अन्न आणि आरोग्य’ आणि ‘ओझोन वाचवा - जीवन वाचवा ‘ या विषयावर ‘पोस्टर मेकिंग स्पर्धा’ पार पडली. ‘पोस्टर मेकिंग स्पर्धे’साठी डॉ. अजय बेले, डॉ. प्रकाश बोरकर, डॉ. संजय रामटेके आणि डॉ. राहुल कांबळे या चार परीक्षकांनी परीक्षण केले.
पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम पारितोषिक: शिमा फातेमा साबीर शेख आणि सायमा अंजुम एस. सय्यद, द्वितीय पारितोषिक प्रफुल धांडे आणि आचल खोब्रागडे, तर तिसरे पारितोषिक: अर्चना राय आणि आकांक्षा बोंकंटीवा यांना मिळाले. पदवी अभ्याक्रमात प्रथम पारितोषिक लचिमस्वामी पी. गाडू, द्वितीय पारितोषिक: नम्रता मून आणि हर्षिता मिश्रा,तर तृतीय पारितोषिक पूजा कुशवाह यांना जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कु कविता आणि कु रेणुका या विद्यार्थिनींनी केले तर आभार कु. प्रिया यांनी मानले. यावेळी विद्यार्थांसह रसायनशास्त्र विभागाचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, दिनेश पटेल, आ.किशोर जोरगेवार, संदीप गड्डमवार, सुधाकर पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.