Click Here...👇👇👇

औ. प्र. संस्था,कोरपना येथे " पी.एम. रन फॉर स्किल" मॅरेथॉन स्पर्धा व पदवीदान समारंभाचे आयोजन #korpana

Bhairav Diwase



देशभरात दी.१७ सप्टेंबर या दिनाचे औचित्य साधून राज्यातील औ. प्र. संस्थांमध्ये शिकणारे लाखो प्रशिक्षणार्थी आता ' कौशल्य प्रशिक्षणाचे महत्व ' या बाबत जागृती करण्यासाठी धावणार आहेत,येत्या रविवारी दि.१७ सप्टे. ला औ. प्र. संस्था, कोरपना येथे ' रन फॉर स्किल ' या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सकाळी ८ वाजता करण्यात आलेले आहे.
' रन फॉर स्किल ' या मॅरेथॉन स्पर्धेकरीता कोरपना पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. संदिपजी येकाडे साहेब कार्यक्रमाचे उद्घाटन करून मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवतील तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. नितीनजी विजयराव बावणे, अध्यक्ष युवा प्रतिष्ठान कोरपना हे असतील.
तसेच दरवर्षी प्रमाणे दि. १७ सप्टे. ला उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी यांना ' पदवीदान ' समारंभाचे आयोजन स.११ वाजता करण्यात आलेले आहे.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे स. प्राचार्य श्री.विजय दूपारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून मान. प्राचार्य श्री.खडसे जी वसंतराव नाईक विद्यालय, कोरपना व दालमिया सिमेंट वर्क्स चे H.R. प्रमुख श्री.मान.अभिषेक कुमार मिश्रा हे उपस्थित असतील.