Top News

विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथे वाढत्या डेंगू , मलेरिया, टायफॉइड वर उपाय योजना करा - श्याम भा. बोबडे , भाजप महानगर

आयुक्त/उपआयुक्त व माजी उपमहापौर राहुल पावडे यांना निवेदन

चंद्रपूर:- विठ्ठल मंदिर वार्ड, प्रभाग क्रं. १५ येथे वाढत्या टायफॉइड, मलेरिया, डेंगू अशा वायरल वर उपाय योजना करण्याबाबत भाजप चे युवा नेते श्याम बोबडे यांनी आयुक्त- उपआयुक्त व माजी उपमहापौर राहुल पावडे यांना निवेदन दिले.

गेल्या काही दिवसांपासून टायफॉइड, मलेरिया, डेंगू अशा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. या आजारात रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, नाक वाहणे यासारखी लक्षणे दिसतात. दरम्यान, हवामानातील बदल आणि पावसामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोकाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. रुग्ण वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाऊस व पावसात डासांच्या उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होते.

अशा स्थितीत वेक्टर बोर्न आजारांचा धोकाही वाढतो. या वायरल दरम्यान, डेंग्यू ताप प्रभागातील लोकांना समस्या बनू शकतो. डेंग्यू तापाने लोकांना खूप ताप, डोकेदुखी, डोळ्यांमागील वेदना, थकवा, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसू शकतात. आता तुम्ही विचार कराल की या आजारावर उपाय काय? नोएडा येथील E-260 सेक्टर 27 येथे डॉ कपिल त्यागी यांच्या मते ,डेंग्यू ताप ही गंभीर आणि जीवघेणी स्थिती आहे, त्यामुळे त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.

डेंग्यूमुळे रुग्णाच्या प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही या पत्रा द्वारे श्याम बोबडे यांनी निवेदन दिले की विठ्ठल मंदिर प्रभागात नियममित रित्या नाल्या सफाई, घरोघरी फवारणी, नाल्या वर फवारणी, उघड्या नाल्या बंद करणे, डासांवरील थांबा देण्या साठी च्या योजना व उपाय या सर्व गोष्टींची लवकरात लवकर नोंद घ्यावी ही विनंती.
यात प्रामुख्याने -
१. हिवरपुरी वार्ड -१
२. हिवरपुरी वार्ड-२
३. टागोर शाळा चौक
४. सत्शील चौक
५.विठ्ठल मंदिर
६.मजदूर चौक
७.पठाणपुरा वार्ड
व संपूर्ण प्रभाग

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने