Top News

ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या #chandrapur #gadchiroli #murderगडचिरोली
:- गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुख राहता सय्यद यांची त्यांच्याच पतीने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 3 च्या सुमारास राहता यांचे वडील रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ही घटना उजेडात आली. ही घटना घडली तेव्हा राहत यांची दोन्ही मुले घटनास्थळी उपस्थित होते.

पत्नीची हत्या केल्यानंतर राहत यांचा पती आरोपी तायमिन शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली.विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती.

१५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते. कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने