Top News

सुधीरभाऊंसारखा अष्टपैलू नेता बघितला नाही #chandrapur


भाजपा महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे गौरवोद्गार

बल्लारपूर येथून ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमां अंतर्गत घर घर चलो अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर:- गेल्या पंचेवीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम केले. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळाले. वेगवेगळ्या क्षमता असलेल्या नेत्यांसोबत काम करायला मिळाले. मात्र सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासारखा अष्टपैलू नेता मी आतापर्यंत बघितला नाही, या शब्दांत भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या सौ. चित्रा वाघ यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा गौरव केला.
‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमां अंतर्गत घर घर चलो अभियानाचा शुभारंभ बल्लारपूर येथून झाला , हा कार्यक्रम सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी प्रदेश महिला मोर्च्याच्या महामंत्री अल्का आत्राम, चंद्रपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा प्रदेश सदस्य वनिता कानडे, माजी आमदार जैनुद्दिन जेव्हेरी, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, भाजपा प्रदेश सचिव विद्या देवाळकर, प्रदेश सदस्य रेणुका दुधे, प्रदेश सचिव ममता डुकरे, शहर अध्यक्ष काशिसिंह, रेखाताई डोळस,महामंत्री वंदना अगरकाठे, महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, महामंत्री सायरा शेख, महिला अध्यक्ष वैशाली जोशी, ओबीसी अध्यक्ष रत्नमाला भोयर, रेवतकर ताई,लक्ष्मीताई सागर सोशल मीडिया संयोजिका यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमापूर्वी सौ. चित्राताईंनी बल्लारपूरचे आराध्य दैवत भगवान बालाजीचे दर्शन घेतले. भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा जयघोषणात वाजत 'माझी माती माझा देश ' या कार्यक्रमा अंतर्गत कलश यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी बल्लारपूर येथील स्थानिक नागरिकांनी कलशात पवित्र माती टाकत यात्रेचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वातंत्र्यवीरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या, ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नव्हती. चुलीवर स्वयंपाक करताना धुरामुळे माता-भगिनींचे आरोग्य धोक्यात यायचे. मा. मोदीजींनी प्रत्येक गावात शौचालये पोहोचवली, गॅस कनेक्शन दिले. कोरोना काळात मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे व उत्तम व्यवस्थापनामुळेच आरोग्य यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचली. एवढेच नव्हे तर सर्वप्रथम भारताने व्हॅक्सीन तयार केले.’ यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी शंभर रुपयांत आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला जात असल्याचाही आवर्जून उल्लेख केला.
यावेळी श्री. हरीश शर्मा यांनीही मनोगत मांडले. प्रास्ताविक अल्का आत्राम तर संचालन जयश्री मोहुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संध्या मिश्रा, आरती अक्केवार, वर्षा सुंचूवार, कांता ढोके, सुरेखा श्रीवास्तव, सारिका कनकम, सुवर्ण भटारकर, सरला लांडे, गायत्री हिरण, अर्चना हिरे, शबाना शेख, गुलशन खान, दीपमाला यादव, नाजमा शेख, सुनिता निवलकर, प्रियंका शेंडे, टिकले ताई, ललिता मुडई आदींनी परीश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने