Top News

श्री. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मध्ये डीजे व साऊंड सिस्टम मध्ये अश्लील गाणे वाजविण्यावर बंदी घालावी:- आरंभ बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर #chandrapur

चंद्रपूर:- आगामी दोन महिन्यांमध्ये चंद्रपूर शहरात मोठ्या उत्साहामध्ये श्रीगणेशोत्सव व नवरात्री उत्सव हा साजरा होणार आहे यामध्ये शहरांमध्ये विविध ठिकाणी मंडळ तसेच मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात डीजे व साऊंड सिस्टम वर अश्लील चित्रपटातील गाणे हे मोठ्या प्रमाणात वाजविण्यात येतात. त्याकरिता त्या गाणे वाजविण्यावर बंदी घालून धार्मिक श्रध्दा व भक्तिमय गीते हे वाजविण्यात यावी. व अश्लील गाणे वाजविणारा डीजे सिस्टम वर कारवाई करण्यात यावी. व आपल्या मार्फत धार्मिक, श्रध्दांमय, भक्तिमय गाणे वाजविन्यात यावे.
याबद्दल शहरांमध्ये जनजागृती करून प्रोत्साहन देण्यात यावे. याबद्दलचे निवेदन हे माननीय आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर व डीजे व साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर यांना देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेश दिंडेवार, सचिव प्रवीण गिलबिले, रोहित खेडेकर, कमलेश सहारे, रघु गुंडला इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने