तरुण पर्यावरणवादी मंडळांनी दिले खवल्या मांजरला जीवदान #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0
चिमूर:- शंकरपूर येथील एका महिलेच्या घरी रात्री खवल्या मांजर दिसून आले त्यांनी तरुण पर्यावरणवादी मंडळाच्या सदस्यांना बोलावले त्या मंडळाच्या सदस्यांनी खवल्या मांजर ला पकडून जीवदान दिलेले आहे येथील सुमन व्यवहारे यांच्या घरी शुक्रवारच्या मध्यरात्री खवल्या मांजर शिरले होते स्वयंपाक रूम मधून भांडे पडत असल्याने या महिलेने उठून पाहिले असता त्या हा हा प्राणी दिसून आला त्यांनी लगेचच तरुण पर्यावरणामध्ये मंडळाचे सदस्य विजय गजबे यांना फोन करून बोलावून घेतले त्यांनी या खवल्या मांजरला शिताफीने पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.

येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून ठणठणीत असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने त्याला शंकरपूर येथील वाघाई जंगल परिसरात सोडण्यात आले हा सस्तन प्राणी असून निशाचर आहे बिळात राहत असून मुंग्या त्याचे खाद्य आहे असुरक्षित वाटल्यास शरीराचे वाटोळे करतो अशी माहिती आमोद गौरकर यांनी दिली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी के भी देउकर वनरक्षक आर एस भुरले व्ही डी सोनूने प्रदीप ढोणे जग्गू लांजेवार तरुण पर्यावादी मंडळाचे सदस्य विजय गजभे साईश वारजूकर योगेश बारेकर राजू वाढइ अनमोल चुनचूनवार रितेश गजबे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)