गुरांच्या गोठ्यात हल्ला करून वाघाने केले गोऱ्यास ठार #chandrapur #chimur


चिमूर:- चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मौजा पारडपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शाळेच्या मागेच असलेल्या आनंदरावजी जिवतोडे यांच्या गुरांच्या गोठ्यातुन मध्य रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गोऱ्यास गोठ्यात ठार केले व फरकटत शेतात नेले असून तसेच आजु - बाजुला खुंट्यास बांधून असलेले गुरे सुद्धा पळून गेली हे दृश्य खूपच भयावह होते.

यामुळे परडपार येथील नागरिकांच्या मनात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे वनविभागाने दुर्लक्ष न करता लक्ष देण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची सुद्धा वनविभागाने भरपाई देण्यात यावी अशी गावकऱ्यां तर्फे मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत