Top News

नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या #chandrapur #gadchiroli #murder

गडचिरोली:- गडचिरोली जिह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली आहे. रामजी चिन्ना आत्राम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गडचिरोली जिह्यातील अहेरी तालुक्यात कापेवंचा जवळ नक्षलवाद्यांनी रामजी आत्रामची गोळय़ा घालून हत्या केली. पोलिसांचा खबऱया आहे असा संशय घेत ही हत्या करण्यात आली.

गेल्या दहा दिवसांत नक्षलवाद्यांकडून निर्दोष नागरिकांच्या हत्येची गडचिरोलीतील ही तिसरी घटना आहे. या तिन्ही घटना दक्षिण गडचिरोलीत घडल्या असून तिथे नक्षलवादी अचानक प्रचंड सक्रिय होऊन नागरिकांना लक्ष्य करीत आहे. रामजी आत्राम यांनी गेल्या वर्षी नक्षलवाद्यांची काही माहिती पोलिसांना पुरवली होती. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या एका चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी मारली गेली होती या संशयावरून नक्षलवाद्यांनी रामजी आत्रामची हत्या केली. त्या ठिकाणी अशा आशयाचे पत्रकही ठेवले आहे.

गेल्या दहा दिवसांत निर्दोष नागरिकांच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. भामरागड तालुक्यात पेनगुंडा येथे दिनेश गावडे या युवकाची हत्या करण्यात आली होती, तर टिटोळा येथे पोलीसपाटील लालसु वेडदाची हत्या करण्यात आली होती. आता शुक्रवारी रात्री अहेरी तालुक्यात रामजी आत्रामची हत्या करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने