तालुका क्रिडा संकुलन येथे सराव करणाऱ्या मुलांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे. #Chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

पोंभुर्णा:- मुलांना सरावाकरीता पोंभुर्णा येथे क्रिडा संकुलनाची उभारणी करण्यात आली परंतु सदर क्रिडा संकुनामध्ये सोयी सुविधाचा अभाव असल्यामुळे सरावाकरण्याकरीता येणाऱ्या मुला व मुलींना नाहक त्रास निर्माण होत आहे. करीता महोदय विनंती करण्यात येते की, आपण खाली दर्शविलेल्या बाबींवर लक्ष देवून क्रिडा संकुलनाच्या रखडलेल्या कामांना चालना द्यावी.



१) क्रिडा संकुल सकाळी व सायंकाळी ५.०० वाजता चालु करण्यात यावा.


२) क्रिडा संकुलाचे लाईट पहाटे चालु करण्यात यावे.


३) क्रिडा संकुलनात पुलअप साठी सिंगल बार व डबल बार लावण्यात यावा.


४) रनिंग ट्रॅक दुरूस्त करण्यात यावा.


(५) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.


६) क्रिडा संकुलनासाठी एक केअर टेकर ठेवण्यात यावा..



करीता आपणास विनंती आहे की, आपण वरील सर्व मुद्यांवर आण लक्ष देऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करावे हीच सदीच्छा अन्यथा नाइलाजास्तव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आंदोलन करावे लागेल. 


पवन बंकावार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पोंभुर्णा, छत्रपती कस्तुरे, प्रशांत गोंगले, गौरव चंदेल, प्रमोद ढाक, सूरज ढोले, लोकेश गावरे, स्वप्नील गोरांतवार, रितेश कोटरांगे, महेश नैताम निवेदन देताना उपस्थित होते.