Top News

वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू #chandrapur #sindewahi #mul


चंद्रपूर:- वन्यप्राण्यांसाठी शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने लताबाई लाटकर (५५) व देवीदास इष्टम या दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना आज, गुरुवारी दुपारी उघडकीस आल्या.


सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात महेश बोरकर यांच्या शेतात लताबाई लाटकर कामाला गेल्या होत्या. काम करतानाच त्यांचा विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील उसराळा गावातील देविदास इष्टम (३२) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शेताच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने देविदास यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

परिसरात वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे व वाघांसारख्या हिंसक प्राण्यांच्या संचारामुळे शेतकरी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी सर्वत्र विद्युत प्रवाहित तारांचे कुंपण लावतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने