लग्न कार्यक्रम आटपून येताना काळाचा घाला #chandrapur #nagpur #accident

Bhairav Diwase
0

भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर:- जिल्ह्यातील काटोलमध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली.

क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेनं जात असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेनं जात होते त्यावेळी भीषण अपघात झाला. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)