ग्रामीण भागातील ३ हजार विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेला भेट #chandrapur #visapur #ballarpur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- तालुका क्रीडा संकुल, विसापूर, येथे सुरू असलेल्या ६७ व्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात बघण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ३ हजार विद्यार्थ्यांनी बल्लारपूर क्रीडा संकूल येथे भेट दिली व खेळाडूंचा थरार अनुभवला. 67th national school athletic tournament 2023-24


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात बघता यावी व त्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांची खेळामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हयातील इयत्ता ७ ते १२ च्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेस भेट देण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी केले. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देऊन तालुकानिहाय १०० विदयार्थ्यांचे नियोजन करण्यात आले.



प्रति दिवस प्रत्येक तालुका १०० विद्यार्थी याप्रमाणे दिवसाला १ हजार ५०० विद्यार्थी असे दोन दिवसात एकूण ३ हजार विदयार्थ्यांनी या स्पर्धेस भेट दिली आहे. तसेच ३० डिसेंबर २०२३ ला १ हजार ५०० विदयार्थ्यांची भेट नियोजित आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाकरीता विद्यार्थ्यांमध्ये व पालकामध्ये प्रचंड उत्साह आहे. तालुका स्तरावरुन प्रत्यक्ष क्रीडा संकुलापर्यंत विद्यार्थी आणण्यासाठी परिवहन विभागातर्फे बसेची व्यवस्था करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)