जोडदेऊळ हनुमान मंदिर पठाणपुरा, चंद्रपूर मध्ये गाजली चंद्रपूर लोकसभा शरीर सौष्ठव स्पर्धा.
चंद्रपूर:- शिवजयंती महोत्सव २०२४ निमीत्त बॉडी बिल्डींग असोशिएशन ऑफ चंद्रपूर डिस्ट्रीक्ट चंद्रपूर, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र शरीर सौष्ठव स्पर्धा "जय श्रीराम श्री" कायक्रमाचे आयोजन व सत्कार समारंभ जोडदेऊळ हनुमान मंदिर मंगलकार्यालय, पठाणपुरा रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाला.
हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ व्या जयंती निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अॅड. विजय ग. मोगरे, जेष्ठ विधीज्ञ व अध्यक्ष एफ.ई.एस., चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. रविन्द्रजी भागवत, जेष्ठ विधीज्ञ तथा नगर संघचालक व प्रमुख उपस्थिती कुणाल चहारे युवा नेते, मा. श्री. अरविन्द चौवरे अध्यक्ष जोड देऊळ हनुमान मंदिर, मा. श्री. अजयभाऊ वैरागडे, सामाजिक नेते, मा. सौ. खुसबू अंकुश चौधरी, मा. श्री. रमेश भुते, मा. श्री. राजेन्द्र खांडेकर, मा. श्री. आदेश पुजारी, मा. श्री. नंदकुमार देव, अध्यक्ष बॉडी बिल्डींग असोशिएश ऑफ डिस्ट्रीक्ट, चंद्रपूर मा. प्राध्यापक आशिष चहारे, मा.प्रा. पियुष मेश्राम, अॅड. विजय आमटे, अॅड. श्रीकांत कवटलवार, मा.श्री. गणेश मंचलवार प्रसिद्ध मुर्तीकार, सुभाष आदमाने, कार्यक्राची सुरुवात द्विप प्रज्योलनाने व हनुमानजी यांच्या मुर्तीला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर उद्घाटक व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावणा अॅड. हरिश मंचलवार यांनी केली. अॅड. मंचलवार यांनी "छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य घराघरात वाचले पाहिजे, मनन केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे" राष्ट्रीय बॉडी बिल्डर श्रीकांत बोरसरे, भद्रावती यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिवजयंती महोत्सव २०२४ निमीत्त चंद्रपूर लोकसभा क्षेत्र बॉडी बिल्डींग स्पर्धेचे 'जय श्रीराम श्री' चे मानकरी श्री. शिवकुमार चव्हाण पॉवर जिम, घुग्घुस, बेस्ट मसलमॅन श्री. शिवाजी वाकोडे आर.जीम, बेस्ट पोझर अरबाज शेख सत्तार, वणी. ५५ कि.ग्रा. वजनामध्ये प्रथम क्रमांक संकेश भगत, अरोरा फिटनेस वल्ड जिम, ६० कि.ग्रा. वजनामध्ये प्रथम क्रमांक शिवाजी वाकोडे, आर. जिम, ६५ कि.ग्रा. वजनामध्ये प्रथम क्रमांक शिवकुमार चव्हाण, पॉवर जिम, घुग्घुस, ७० कि.ग्रा. वजनामध्ये प्रथम क्रमांक अरबाज शेख सत्तार, स्टार जिम, वणी उपरोक्त मानकरी ठरले.
पंच कार्यरत चंद्रपूरचे राष्ट्रीय पंच नंदकुमार देव, श्री. शरद पतरंगे, श्री. विलास सुमन, श्री. अनुजकुमार सोनी, श्री. अमित बेले, श्री. भूषन देशमुख, श्री. राकेश बोरीकर, श्री. विनोद गावंडे, श्री. सुनील नन्हे, श्री. रामनारायण रविदास.
सदरहू कार्यक्रमाचे आयोजक अॅड. हरिश मंचलवार व मित्र परिवार तर्फे चंद्रपूर लोकसभा क्षेत्र बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये २००० पुरुष व महिला बालगोपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मा. श्री. गणेश रासपायले, आभार प्रदर्शन मा. श्री. गणेश मंचलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अनुजकुमार सोनी, श्री. भूषण देशमुख, श्री. किरण ठाकरे, श्री. गणेश रासपायले, श्री. सुभाष आदमाने श्री. अभिजीत बावणे, श्री. नितीन खोब्रागडे, श्री. त्रिकेश खनके, श्री. मयुर बानकर, श्री. धनराज तपासे यांनी सहकार्य केले.