Top News

सर्वसामान्यांना दिलासा देणारा व विकसित भारताच्या संकल्पाला खऱ्या अर्थाने साकार करणारा अर्थसंकल्प:- आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया #chandrapur #chimur

चिमूर:- पुन्हा एकदा सर्वसामान्यांना केंद्र बिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल माननिय अर्थमंत्री व माननिय पंतप्रधानांचे मनापासून आभार. भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. शेतकरी, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार, पर्यटन सर्व गोष्टींकडे लक्ष देणारा अर्थसंकल्प आहे. देशाला नवी दिशा आणि नव्या आशा मिळाल्या असून सरकार सबका साथ आणि सबका विकास यावर काम करत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या १० वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी हे सरकारचे मुख्य प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करणे देशासाठी महत्त्वाचे असून या दिशेने काम केले जात आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक घरात पाणी आणि प्रत्येक घरात वीज तसेच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे. लोकांसाठी संधी वाढवल्या जात आहेत.

देशातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा व दिलासा देणारा अर्थसंकल्प असून विकसित भारताच्या संकल्पाला खऱ्या अर्थाने साकार करणारा अर्थसंकल्प आहे. रामराज्य येण्याची ही नांदी आहे. असे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने