कोंबडीच रक्त शिंपडून बिबट्याने खाल्ल्याचा बनाव करत मुलगी प्रियकरासोबत पळाली! #Chandrapur #ahmadnagar #lovestory

गावकऱ्यांनी शोधलं; सत्य समजताच बापाने जीवन संपवलं
आई सकाळी उठली. हाताला ओले लागले म्हणून पाहिले तर रक्ताचा सडा व मुलगी गायब. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचा संशय व आईबापाने टाहो फोडला. गावातील तरुण हातात काठ्या घेऊन शेती, डोंगर पायदळी तुडवत शोधत फिरले. मात्र मुलगी सापडली नाही.

मुलगी सापडेना म्हणून आई वडिलांनी पाण्याचा घोटही घेतला नाही. मग दाखल झाले पोलीस व वनविभाग. अन् सुगावा लागला की ते रक्त तर कोंबडीचे आहे व मुलगी एका प्रियकरासोबत पळून गेली. बापाला धक्का बसला व बापाने गळफास घेतला. दु:खी अंत:करणाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.

काळजाचा ठाव घेणारा हा थरार घडलाय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हिवरगाव येथे. मुलीनेच आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी शक्कल लढविली असल्याचे समोर आले. अधिक माहिती अशी की, 11 मे 2024 रोजी रात्री हिवरगाव येथील एक कुटुंब झोपी गेले.

आई आणि मुलगी बाहेर झोपलेले. आई उठली तर तेथे तिला रक्त दिसले. बिबट्याने मुलीला उचलून नेले असल्याचे तिला वाटले व एकच काहूर केले. ग्रामस्थांना अनेक ठिकाणी शोधूनही ती न सापडल्याने वनविभाग आणि पोलीस प्रशासनास प्रचारण करण्यात आले.

त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करताच ते रक्त मानवी नसून ते कोंबडीचे असावे तसेच काही कुंकवाचे देखील पाणी असावे असा संशय आला. तपासणी अहवालदेखील तोच आला. त्यानंतर हा बनाव असल्याचे समजले. पोलिसांनी काही संशयित बाबी समोर ठेवत तपास केला.

मुलीने पळून जाण्यासाठी हा बनाव केला असल्याचे समोर आले. शेळ्या मेंढ्या चारण्याच्या संपर्कातून मुलीची ओळख नळवाडी येथील एका मुलाशी झाली व त्यांनी संगनमताने पळून गेले असे समोर आले.

हे बापाला समजताच त्यांनी घरात जाऊन एक दोरी आणत झाडावर जात गळ्याभोवती गळफास घेतला व उडी मारली. काही लोकांनी धावत जात त्यांना मिठी मारली परंतु गळ्याला दणका बसल्याने त्यांनी प्राण सोडले होते.

दरम्यान यावेळी लोकांनी बापाच्या मृत्युला जबाबदार धरून मुलीवर व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी भावना व्यक्त केली.
#साभार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या