ही चूक महागात पडली! #Chandrapur #Akola #shock

कुलरचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू
अकोला:- उकाडा वाढत असल्यामुळे एसी आणि कुलरचाही वापर वाढला आहे. दरम्यान अकोल्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कुलरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मळसुर गावात ही दुःखद घटना घडली आहे.

कुलर सुरू करत असताना जोरदार विजेचा झटका लागताच तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नितीन गजानन वानखडे असं शॉक लागून मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कुलरमध्ये पाणी भरताना किंवा सुरू करताना अधिक सावध राहणं आवश्यक आहे. अकोल्यामुळे कुलरमध्ये पाणी भरताना नितीन वानखडे या तरुणाना विजेचा धक्का बसला.

नितीन गजानन वानखडे (38) कामावरुन घरी परतले होते, त्यावेळी घरातील कूलर बंद पडले म्हणून त्यांनी कूलर सुरू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला व कूलर त्यांच्या अंगावर पडला. ही घटना त्यांचे वडील व पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला आणि ग्रामस्थांच्या मदतीच्या त्यांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आलं. माक्ष अकोल्याला पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या